कोविड-19 लसीकरण जनजागृतीसाठी नांदेड ते कंधार सायकल रॅलीचे आयोजन

0 0
Read Time:1 Minute, 15 Second

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचा पुढाकार

नांदेड (प्रतिनिधी) दि. 8 :- कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या  जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज नांदेड ते कंधार व परत अशी सायकल रॅली आयोजित केली होती. यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला. नांदेड सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी यात सहभागी घेतला.

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी स्वतः सपत्नीक ही सायकल रॅली पूर्ण केली. नांदेड ते कंधार या मार्गावर येणाऱ्या गावात थोडा वेळ थांबून नागरिकांना कोविड-19 लसीकरणात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याच्या समवेत के कार्तिकेयन, कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे, अझीम पंजवाणी, गिरीश येवते, पालिवाल व युवक सहभागी झाले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *