जिल्ह्यात एकाचवेळी साडेतीन हजार अंगणवाडी केंद्रातून वृक्ष लागवाड

0 0
Read Time:5 Minute, 16 Second

नांदेड (प्रतिनिधी) :- हरितालिका म्‍हणजे निसर्गाकडे जाण्‍याचा अभिनव उपक्रम असून गावस्‍तरावर वृक्ष लागवडीसह अंगणवाडीतून परसबागा फुलवून मुलांच्‍या सकस आहारात वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्‍हा परिषदेच्‍या महिला बाल विकास विभागाच्‍या वतीने पोषण मास कार्यक्रमा अंतर्गत आज गुरुवार दिनांक 9 सष्‍टेंबर रोजी नांदेड तालुक्‍यातील लिंबगाव येथे अंगणवाडीची हरितालिका उपक्रमांतर्गत शेवगा व विविध फळांचे वृक्ष लागवड करुन जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

यावेळी महिला व बाल विकास समितीच्‍या सभापती सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सरपंच रेखाताई धनगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, महिला व बाल विकास विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी विजय बोराटे आदींची यावेळी उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, पर्यावरण समृध्‍दीसाठी वृक्ष लागवड महत्‍वाची असून प्रत्‍येक नागरिकांनी वृक्षांची लागवड करुन त्‍याचे संगोपन करत गावातच ऑक्सिजन पार्क तयार करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. सष्‍टेंबर महिना हा राष्‍ट्रीय पोषण महिना म्‍हणून साजरा करण्‍यात येत असतो. यानिमित्‍त अंगणवाडीत देण्यात येणा-या आहाराची पौष्टीकता वाढवून हा आहार सकस व्हावा यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगांचा तसेच पानांचा खूप मोठा उपयोग करण्‍यात यावा. त्यामुळे निश्चितच आहाराची पौष्टीकता वाढून प्रत्येक माता, बालक सुदृढ होतील. त्‍यासाठी जिल्‍हयातील सर्व अंगणवाडी केंद्रातून शेवगा व फळांची झाडांसह परसबाग फुलविण्‍यात यावी, असे जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. कोवीड काळात अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर यांनी गावस्‍तरावर आरोग्‍यविषयक सर्वेक्षण करुन आरोग्‍याबाबत ग्रामस्‍थांची काळजी घेतली आहे. यावेळी त्‍यांनी केलेल्‍या कामाचे कौतुक मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी केले.

प्रारंभी उपस्थित मान्‍यवरांचा शॉल व बुके देवून सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍तविक बाल विकास प्रकल्‍प अधिकारी विजय बोराटे यांनी केले. यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे यांनी गावस्‍तरावर करण्‍यात येणा-या विविध विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्‍याध्‍यापक साळवे यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच विश्‍वास कदम, गट शिक्षणाधिकारी रुस्‍तुम आडे, विस्‍तार अधिकारी जिवन कांबळे, मिलिंद व्‍यवहारे, महिला व बाल कल्‍याण विभागाचे विस्‍तार अधिकारी सोनवने यांच्‍यासह शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा वर्कर व ग्रामस्‍थ यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.


6 हजार 785 झाडांची लागवड –

अंगणवाडीची हरीतालिका या उपक्रमा अंतर्गत नांदेड जिल्‍हयातील सर्व अंगणवाडी केंद्रातून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्‍या नांवे 3 हजार 775 शेवग्‍याची झाडे तर 3 हजार 10 विविध फळांची एकाचवेळी लागवड करण्‍यात आली. लागवड करण्‍यात आलेल्‍या वृक्ष लावगडीचे फोटो व अहवाल अक्षांश व रेखांक्षाच्‍या माहितीसह ऑनलाईन करण्‍यात आले.


 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *