जिल्ह्यात एकाचा मृत्यू तर 3  कोरोना बाधित झाले बरे

0 0
Read Time:3 Minute, 22 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 797 अहवालापैकी 766 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. तसेच आज रोजी एकही अहवाल कोरोना बाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 303 एवढी असून यातील 87 हजार 621 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 30 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील गोन्डला येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा 15 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यात बिलोली तालुक्यांतर्गत 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आज 30 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 24 हजार 30
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 20 हजार 738
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 303
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 621
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-31
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-30
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *