डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

0 0
Read Time:2 Minute, 18 Second

डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी) दि २० :-  वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे करण्यात आले.

डॉ सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकलींगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. सदरची शर्यत ही अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पुर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरीता मानसिक व शारिरीक तंदुरुस्ती सुदृढ तसेच सराव क्रमप्राप्त होते. याकरिता डॉ सिंगल यांनी ६ महिने प्रशिक्षण घेतले.
त्यांनी ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रत्यक्षात सदर शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारिरीक थकव्यामुळे काही सदरील शर्यत मध्येच सोडून दिली. तथापि, डॉ सिंगल यांनी मानसिक तयारी असल्याने ही शर्यत वयाच्या पन्नाशितही त्यांनी पुर्ण केली

सदरील शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारिरीक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला तो प्रवास तरुणांचे मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरीता नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ. वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सह लेखिका आहेत.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल देखील उपस्थित होत्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *