डॉक्टारांना युजर आयडी प्राप्त करुन घेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

0 0
Read Time:2 Minute, 18 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 25 :- अनुज्ञप्ती विषयक कामासाठी अर्जदारांची तपासणी संबंधीत डॉक्टरांमार्फत करण्यात येऊन नमुना-१ (अ) अपलोड  करण्यात येणार आहे. जिल्हयातील पात्र डॉक्टारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आवश्यककागदपत्रांची पडताळणी करुन  परिवहन कार्यालयामार्फत युजरआयडी प्राप्त करावयाचे आहे. सर्व संबंधीत वैद्यकीय व्यवसायिकांना आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रतींसह अनुज्ञप्ती विभागप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे संपर्क साधून युजरआयडी 30 सप्टेंबर 2021 पर्यंतप्राप्त करुन पुढील कार्यवाही करुन घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

शासनाने आधार क्रमांकाचा वापर 

करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतुद केली आहे. त्यामुळे घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देण्याची सुविधा अर्जदारास उपलब्ध  करुन दिली आहे. या चाचणीत उत्तीर्ण होऊन त्यास घर बसल्यास शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट मिळणार आहे. नागरिकांना प्रादेशिक परिवहन  कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही व यातून वेळेची बचत होणार आहे. मोटार वाहन कायदा व अनुषंगीक नियमात नमूद अनुज्ञप्ती विषयक कामासाठी आवश्यक  नमुना-1(अ) हे मेडीकल प्रमाणपत्र सुध्दा पात्र डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यवसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पध्दतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित करण्यातआली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *