नित्य व्यायाम व सरावातच फिट इंडियाचा मंत्र – जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे

0 0
Read Time:3 Minute, 15 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 25 :- प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरुकता ठेऊन दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळात कोविड-19 सारख्या साथीच्या आजारांचा विचार करता प्रत्येकाने जागरुक राहण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. भारताला खऱ्या अर्थाने फिट अर्थात तंदुरुस्त ठेवायचे असेल तर प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यातच फिट इंडियाचा मंत्र दडलेला असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजित फिट इंडिया रनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नेहरु युवा केंद्राच्या अधिकारी चंदा रावळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. नेहरु युवा केंद्र संगठन युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकारच्यावतीने फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले होते. येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोर आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे युवक व युवती सहभागी झाले होते.

एनसीसीचा फिट इंडिया रन – प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव

भारताला आरोग्याच्यादृष्टिने सशक्त करण्यासाठी छात्र सैनिकांनी पुढे येऊन युवकांच्या मनात जनजागृती करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी केले. 52 महाराष्ट्र बटालीयन राष्ट्रीय छात्रसेना नांदेडच्यावतीने येथील पिपल्स महाविद्यालयाच्या प्रांगणातून दौड आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी समादेशक अधिकारी लेफ्टनंट कर्नल वेंट्रीवेलू, लेफ्टनंट आर. पी. गावंडे, केअर टेकर डॉ. आर. पी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. इंगळे, स्वच्छता निरीक्षक वाय. के. ढगे, डॉ. अन्सारी, सुबेदार जमन सिंघ, सुभेदार महादेव भोसले, नायब सुभेदार लाल मोहमंद, हवालदार जोगिंदर लाल, देवेंद्रसिंघ, संजय कुमार, सरोज कुमार, नायक सुनिल कुमार यादव, राजेंद्र कुमार, आर. आर. पवार, व्हि. एम. गवळी, शेख अहमंद, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *