आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप

0 0
Read Time:2 Minute, 51 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 26 :- अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा पोहोचावा यासाठी आम्ही आग्रही असून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी  यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल वरील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने वडवणा येथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे वाटपाचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायणराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, तहसीलदार किरण अंबेकर, जि. प. सदस्य साहेबराव धनगे, बालाजीराव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सिद्धनाथ मोकळे, प्रकाश पाटील, सतिश सावंत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करुन कृषि कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले. तहसीलदार किरण अंबेकर यांनी ई पीक नोंदणी बदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे यांनी तर सुत्रसंचालन किशोर नरवाडे यांनी केले.

या कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच  देविदास सरोदे, वैजनाथ सूर्यवंशी हनुमान चंदेल, बालाजी पोपळे, सचिन पाटील, रोहिदास हिंगोले, गजानन कदम, घनश्याम सूर्यवंशी, विश्वास कदम रतन भालेराव, परमेश्वर पाटील,कमलेश कदम, प्रल्हाद जोगदंड,होनाजी जामगे,संतोष भारसावडे, गणेशराव बोखारे, गणेशराव शिंदे बाबासाहेब जोगदंड व तालुक्यातील व गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ईरबाजी कदम, संतोष कदम, गोविंद कोकाटे, पांडुरंग कदम  संजय पोहरे ,नागोराव कदम मारोती कदम व सर्व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *