धनगर समाजातील विद्यार्थ्यांना निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0 0
Read Time:3 Minute, 54 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 1 :- जिल्ह्यातील भटक्या जमाती–क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकीत निवासी शाळामध्ये शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. यानुसार धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळामध्ये प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील नमूद शाळांमध्ये शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इ. सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. 1) लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. २) विद्यार्थ्याच्या पालकांने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्यांने दिलेल्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. ३) विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न मर्यादा रु. 1 लाख इतकी असावी. 4) सन 2021-222 या वर्षात विद्यार्थी इयत्ता पहिली किंवा इयत्ता दुसरी मध्ये प्रवेशित असावा.

निवड केलेल्या निवासी शाळामध्ये पुढील संस्थाचा समावेश आहे. यात तुकाई प्रतिष्ठान नांदेड या संस्थेअंतर्गत गोदावरी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर स्कूल, मरळकवाडी येथे 200 विद्यार्थी, एज्युकेशन सोसायटी नायगाव बा. जि.नांदेड अंतर्गत लिटल स्टेप इंग्लिश स्कूल ता.नायगाव (खै) येथे 150 विद्यार्थी, शिवबा एज्यूकेशन सोसायटी, नांदेड या संस्थेअंतर्गत जिनियस पब्लिक स्कूल, वसंतनगर ता. जि. नांदेड येथे 300 विद्यार्थी, कै.व्यंकटराव पाटील ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, डोंगरगाव ता. लोहा या अंतर्गत श्री शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल दत्तनगर, नांदेड येथे 200 विद्यार्थी आणि गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट, शंकरनगर, ता. बिलोली. जि नांदेड अंतर्गत गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर ता. बिलोली. जि नांदेड येथे 100 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज स्विकारले जातील.

हे अर्ज 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत (सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) स्विकारले जातील. प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, नांदेड यांचे नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *