सहकारी गृहनिर्माण संस्थेवर पॅनलची नेमणूक

0 0
Read Time:1 Minute, 57 Second

नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ, ७८ अ अन्वये विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर पॅनलची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या अ व ब प्रवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी व इच्छुकांनी यांनी ४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज करावा असे विभागीय संहनिबंधक यांनी कळविले आहे.

तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी आणि शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए) उच्चतम सहकारी पदविका (एच.डी.सी.) धारक, अथवा चार्टड अकाऊटंट, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डब्ल्यू.ए) कंपनी सेक्रेटरी अथवा सहकरी खात्यातील प्रशासन, तसेच नागरी कर्मचारी सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक पदावर किमान पाच वर्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती किंवा कायद्याची पदवी, संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. अशा पात्रता धारक व्यक्तींना अर्ज करावयचा आहे.

अर्जाचा विहित नमुना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातुर विभाग, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातुर, उस्मानाबाद, बीड, नांदेड सर्व तालुका उपनिबंधक सहकारी संस्थ्‍ोमध्ये अर्ज करावा असे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *