BSF चा जवान संतोष गंगाधरराव सिदापुरे यांना जोधपूर येथे वीरमरण.

0 0
Read Time:4 Minute, 3 Second

नांदेड (प्रतिनिधी) :- सोनखेड नगरीतील या एका शेतकरी आणि अध्यात्मिक वारसा असलेल्या घरात संतोषचा जन्म झाला. त्याचं पहिलीपासून ते चौथी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोनखेड आणि पाचवी ते बारावी पर्यंतच शिक्षण श्री शिवाजी विद्यालय, सोनखेड येथे झालं.

लहानपणापासूनच खेळ आणि व्यायामाची आवड तसेच देशभक्ती संतोषच्या अंगी होती. घरी वडिलोपार्जित चांगली शेतजमीन होती म्हणून बारावीनंतर वडिलांसोबत शेती करत करत त्याने भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. यादरम्यानच अध्यात्मिक घराणं आणि निर्व्यसनी, होतकरू मुलगा म्हणून लग्नासाठी पाहुणे मंडळींकडून त्याला विचारणा सुरू झाली आणि चांगला योग जुळून येताच त्याचे दोनाचे चार हात सुद्धा झाले. या दाम्पत्याचा संसार अगदी थाटामाटात सुरू झाला, परंतु संसारात मग्न राहून त्याने आपल्या ध्येयाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. त्याचा व्यायाम आणि भरतीची तयारी पूर्वीप्रमाणेच सुरू होती. अशातच लग्नाला एक-दोन वर्षाचा कालावधी ओलांडल्यानंतर सन २०१० साली त्याला बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स(BSF)कडून बोलावणं आलं. त्याला त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांच फळ मिळाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु आता लग्न झालं, सुखाचा संसार सुरू आहे, म्हणून आता सैन्यदलात रुजू न होता आपण आपला संसार आणि शेती योग्य पद्धतीने करावी असा काही पाहुणे मंडळींनी त्याला आग्रह धरला. परंतु संतोषची देशभक्ती आणि देशसेवेची आवड यापुढे कुणाचच काहीही चाललं नाही आणि संतोष BSF मध्ये प्रशिक्षणासाठी रवाना झाला.

त्याने जोधपुर (राजस्थान) येथे प्रशिक्षण पूर्ण करून भारत-पाकिस्तान बॉर्डर, जम्मू कश्मीर आणि राजस्थान येथे अत्यंत जोखीम पत्करून आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रूला प्रतिउत्तर देऊन उल्लेखनीय कार्य बजावलं. यानंतर त्यांची नियुक्ती गणतंत्र दिवसानिमित्त दिल्ली राजपथावर होणाऱ्या परेडसाठी करण्यात आली. (BSF)च्या जॉबाज टीमचे हुन्नरबाज जवान म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करत त्याने सलग तीन वर्ष या परेडमध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्याच्या व धैर्याच्या जोरावर अनेक मेडल्सही मिळवली.
अशा पद्धतीन त्याची देशसेवा सुरळीत सुरू होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. काल दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी सलग बाराव्या वर्षी प्रामाणिकपणे देशसेवा करत असताना जोधपुर (राजस्थान) येथे त्याचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी कळताच साऱ्या सोनखेड व परिसरात शोककळा पसरली.
संतोषच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ वहिनी असा मोठा परिवार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *