नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस १४ दिवस रद्द

0 0
Read Time:1 Minute, 21 Second

नांदेड (प्रतिनिधी) :- सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान २६.३३ किलोमीटर चे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे, गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस हि हुजूर साहिब नांदेड येथून निघणारी पनवेल एक्स्प्रेस दिनांक १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस हि पनवेल येथून निघणारी पनवेल एक्स्प्रेस दिनांक १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे, असे दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *