आसना नदीवरील नवीन पूल विजयादशमीपासून वाहतूकीस होणार खुला

0 0
Read Time:3 Minute, 13 Second

▪️ जनतेच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य

नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड येथून विदर्भ, तेलंगणाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेल्या आसना नदीवरील पुलाला आता नवीन पुलाची जोड मिळाली आहे. या मार्गावरील लहान व अवजड वाहनांची होणारी वाहतूक, वाहनांची संख्या आणि अपघाताचे  प्रमाण लक्षात घेऊन आसना नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. गत जानेवारी महिन्याच्या अखेरीस भूमीपूजन झालेल्या या पुलाचे काम अवघ्या 9 महिन्यात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. जनतेच्या हिताला अधिक प्राधान्य देऊन नवीन उभारण्यात आलेला हा पूल उद्घाटनाचा कोणताही सोपस्कार न करता येत्या विजयादशमीपासून खुला करण्याचा  निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन युध्दपातळीवर गुणवत्तापुर्ण कामातील कटिबद्धतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

अवघ्या 250 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती कंत्राटदार टी ॲन्ड टी लि. पुणे यांच्याकडून सुरक्षिततेचे सर्व मापदंड व निकष पूर्ण करून केली आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलापेक्षा या पुलाची उंची थोडी अधिक घेतल्याने पूर परिस्थितीतही या नवीन पुलावरुन पाणी गेले नाही, हे विशेष. या पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची झालेली सुमार अवस्था, सध्या वाहतूक सुरू असलेल्या पुलावरील मार्गाची झालेली दूरअवस्था, अपघाताची  श्रृखंला, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले नागरीक, राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने चालू असलेल्या प्रस्तावित पुलाबाबतची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सदरील पूल या विजयादशमीपासून कोणत्याही औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती भोकर येथील कार्यकारी अभियंता कोरे यांनी कळविले आहे. पुलाच्या पोचमार्गाचे व इतर काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *