संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरण करण्यास प्रतिबंध

0 0
Read Time:2 Minute, 33 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि.12 :- संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक  असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, आस्थापना, मंदिरे व महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड, दुरदर्शन केंद्र राजेंद्र नगर किनवट अ वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड ब वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा नांदेड यांचा समावेश आहे.  ब वर्गवारीतील आस्थापना – श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड, रेल्वे स्टेशन नांदेड,  पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड, डी मार्ट कॅनालरोड नांदेड
महत्वाची धार्मिक स्थळे – सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर संस्थान , दत्तशिखर मंदिर , संस्थान माहुर ता.माहुर जि.नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू  करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *