नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

4 0
Read Time:1 Minute, 31 Second

नांदेड (प्रतिनिधी) :-  शंकर नगर तालुका बिलोली येथील भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्ष इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी  निवड चाचणी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.इच्छुकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असून  प्रवेशाकरिता  www.navodayz.gov.in किंवा www.nvsadmissionclassnine या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२२ साठी ३० नोव्हेंबर २०२१ तर नववी करिता ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यत ऑनलाईन फार्म भरता येतील.  नांदेड जिल्ह्यातील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी अर्ज करावा. इयत्ता सहावीच्या प्रवेश परिक्षा  ३० एप्रिल 2022 रोजी  तर  नववी वर्गात प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा ९ एप्रिल २०२२ रोजी होईल. इयत्ता सहावीसाठी ८० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.नववी साठी रिक्त जागा झाली तर प्रवेश उपलब्ध होईल असे  आवाहन प्रभारी प्राचार्य अवधेश कुमार  पांण्डेय यांनी केले आहे.

Happy
Happy
25 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
75 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *