कोविड-१९ आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाबाबत लवकरच कार्यपद्धती

0 0
Read Time:1 Minute, 59 Second

नांदेड (प्रतिनिधी) :-  सर्वोच्च न्यायालयाचे ३० जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या सूचनेनुसार कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे.

त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या निर्देशानुसार ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड नियंत्रण कक्ष / आपत्ती व्यवस्थापन प्रभाग तळमजला, वजिराबाद नांदेड – ४३१६०१. संपर्क क्र. (०२४६२) २३५०७७, टोल फ्री क्र. १०७७ वेब साईट:-www.nanded.gov.in   ईमेल:- nandedrdc@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी नांदेड आहेत. मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपद्धती लवकरच अधिसूचित करण्यात येईल.  त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड विभागाने  कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *