रब्बी हंगामातील पिकांच्या पाणी व्यवस्थापनासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

0 0
Read Time:3 Minute, 42 Second

▪️अटीच्या अधीन राहून नमुना नंबर ७, ७(अ) वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार

नांदेड (प्रतिनिधी)  :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन २०२१-२२ मध्ये १५ नोव्हेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत अटीच्या अधीन राहून नमुना नंबर ७, ७(अ) वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. ७ वर भूसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर ७, ७,(अ) चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात ३० नोव्हेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन.पी. गव्हाणे  यांनी केले आहे.

यासाठी पुढीलप्रमाणे अटी आहेत.

शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्राधान्याने शक्यतो चारा पिके व भुसार पिके करावीत. पाणी अर्जासोबत वहिवाटीचा सातबारा उतारा जोडावा. पाणी नाश टाळण्यासाठी लाभाधारकांनी शेतचाऱ्या दुरुस्त करुन घ्याव्यात पाटमोट संबंध नसावा. शंकररावजी चव्हाण प्रकल्पावर उपसा सिंचनास मंजुरी असणाऱ्या संस्था/वैयक्तीक बागाईतदार यांनी त्यांचे नमुना नं. 7 चे पाणी अर्ज सादर करावेत. थकबाकीदार बागायतदार यांना त्यांचेकडील थकबाकीची संपुर्ण रक्कम भरल्यानंतरच त्यांना मंजुरी दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत थकबाकीदाराना पाणी दिले जाणार नाही. धरणातील पाण्याचा साठा, कालव्याची व फाटयाची वहन क्षमता, वहन कालावधी यांचा विचार करुन मागणी क्षेत्रास मंजुरी देताना क्षेत्रात कपात केली जाईल. उडाफ्याचे क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. पाणी मागणी अर्ज न देता पिके केल्यास या पिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही. पाणी न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास संबंधित लाभधारक जबाबदार राहतील. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरेल त्या नियोजनाप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतर पाणी न मिळाल्याने पिकांचे कोणत्याही प्रकाराने नुकसान झाल्यास, त्यास  जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. वरीलप्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठयास शासकीय आदेश लागू राहतील असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *