पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आकडा वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही वाढतं असून तो एक लाखांच्या वर गेला आहे.

आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 532 इतकी झाली आहे. म्हणजेच हे प्रमाण एकूण बाधितांच्या 85 टक्के आहे. सोमवारी 1100 रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1456 असून या रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

प्रत्यक्षात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 393 इतकी आहे. त्यातील उपचार घेत असलेल्या 928 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामधील 479 रुग्ण व्हेंटीलेटरवर असून, 449 रुग्ण आयसीयूमधी उपचार घेत आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात 39 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 832 एवढी झाली आहे.

दरम्यान, काल दिवसभरात विविध केंद्रावर 2 हजार 807 रुग्णांची स्वॅब चाचणी करण्यात आली असून आत्तापर्यंत 5 लाख 37 हजार 432 रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे.