ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्राराज्य “युवागौरव” पुरस्कार स्वरुप वैद्य यास जाहीर

नांदेड :- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिल्या जाणा-या राज्यस्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये ग्रीन फाउंडेशन पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार, युवागौरव पुरस्कार, सामाजिक पुरस्कार, कोरोना यौध्दा पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार इ.सर्व विभागातील पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा माजी सह चेअरमन साधना सहकारी बॅक, मा.बाळासाहेब कोळपे सर व ग्रीन फाऊडेंशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. अमितजी जगताप सर तसेच काळभोर उद्योजक मनीष शेठे सर व सचिन ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, प्रीतम पाटिल सर यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. स्वरुप सुंदरराज वैद्य यास “युवागौरव”पुरस्कार जाहिर झाला आहे.तो श्री.छत्रपती शाहू महाराज उच्चमाध्यमिक(विज्ञान) विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तसेच या पुरस्कार निवडीबद्दल (पोलिस सहाय्यक निरक्षीक)प्रसाद वागरे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, वैशाली क्रांतीकुमार भुक्तरे, सुंदरराज वैद्य, हेमंत वागरे, प्रा.गुणवंत सरोदे, प्रा.सीमा मेहत्रे/राउत, विलास शिंदे सर, रुपाली वागरे/वैद्य, अमोल भालेराव जिल्हाध्यक्ष ग्रीन फाउंडेशन यांनी स्वरुपचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *