१८९ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी ; ७६ बाधितांची भर तर एकाचा मृत्यू   

नांदेड:- शनिवार २४ ऑक्टोंबर २०२० रोजीच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात १८९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ७६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३६ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे ४० बाधित आले.
 
आजच्या एकुण १ हजार ४६६ अहवालापैकी  १ हजार ३७० अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता १८ हजार ६५२ एवढी झाली असून यातील  १७  हजार ९५ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ९२९ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.
 
या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी सिडको नांदेड येथील ६६ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४९९ झाली आहे.
   
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ५, मुखेड कोविड केंअर सेंटर २, नायगाव कोविड केंअर सेंटर ३, किनवट कोविड केंअर सेंटर ५, लोहा कोविड केंअर सेंटर १, खाजगी रुग्णालय २५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५, धर्माबाद कोविड केअर सेंटर ६, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन १२७, अर्धापूर कोविड केंअर सेंटर ५, बिलोली कोविड केंअर सेंटर ५ असे १८९ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.८४ टक्के आहे.
 
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १९, अर्धापूर तालुक्यात १, लोहा २, देगलूर १, मुखेड ५, उमरी १, नांदेड ग्रामीण १, मुदखेड १, हदगाव १, बिलोली १, कंधार १, परभणी २ असे एकुण ३६ बाधित आढळले. 
 
तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र १६, भोकर तालुक्यात २, लोहा ८, बिलोली १, नायगाव १, अकोला १, नांदेड ग्रामीण १, किनवट ३, मुखेड ५, हिंगोली १, उत्तरप्रदेश १ असे एकूण ४० बाधित आढळले.
 
जिल्ह्यात ९२९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १५८, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित ४२५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे ४६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे ३१, हदगाव कोविड केअर सेंटर ९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ११, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ५,  मांडवी कोविड केअर सेंटर ७, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे ७, लोहा कोविड केअर सेंटर येथे १०, मुदखेड कोविड केअर सेटर ५, माहूर कोविड केअर सेंटर २३, किनवट कोविड केअर सेंटर येथे २३, धर्माबाद कोविड केअर सेंटर ४, उमरी कोविड केअर सेंटर ७, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, अर्धापूर कोविड केअर सेंटर ६, भोकर कोविड केअर सेंटर १३,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर १, खाजगी रुग्णालयात दाखल ११४, लातूर येथे संदर्भीत १, हैद्राबाद येथे संदर्भीत २, औरंगाबाद येथे संदर्भीत १ झाले आहेत.
 
सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ७१, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे ९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७७ एवढी आहे.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब – १ लाख ५ हजार १३१;
निगेटिव्ह स्वॅब – ८३ हजार १८७ ;
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – १८ हजार ६५२ ;
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – १७ हजार ९५ ;
एकूण मृत्यू संख्या – ४९९ ;
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे शेकडा प्रमाण ९४.८४;
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ५ ;
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ४ ;
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ३८६ ; 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ९२९ ;
 
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *