५१ कोरोना बाधितांची भर; ५९ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी तर एकाचा मृत्यू

नांदेड :- ५ नोव्हेंबर रोजीच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ५१ व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. ५९ बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर एकाचा मृत्यू. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३१ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे २० बाधित आले.

आजच्या एकुण ९२६ अहवालापैकी ७७१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १९ हजार ३३७ एवढी झाली असून यातील १८ हजार १९९ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ४५३ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ३४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यशवंतनगर नांदेड येथील ६५ वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५१९ झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १९, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५, खाजगी रुग्णालय ६, नायगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण २ असे एकूण ५९ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३१ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १२ हदगाव तालुक्यात १, लातूर ३, नांदेड ग्रामीण २, अर्धापूर तालुक्यात २, असे एकूण २० बाधित आढळले.

जिल्ह्यात ४५३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ७५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ३३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ४१, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १४०, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ४, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण २४, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १०, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण २१, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण १२, बारड अंतर्गत गृह विलगीकरण १, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण १, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १५, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २, खाजगी रुग्णालय ५२ आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १३९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७१ एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब – १ लाख १८ हजार ८०३
निगेटिव्ह स्वॅब – ९५ हजार ९९०
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – १९ हजार ३३७
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – १८ हजार १९९
एकूण मृत्यू संख्या – ५१९
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – २
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – १
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ४५१
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ४५३
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले ३४ .

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

vip porn full hard cum old indain sex hot