स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण, इन्‍डोअर हॉल खेळ, सिनेमा हॉल, सुरु ठेवण्यास परवानगी

नांदेड :- स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्‍था, इन्‍डोअर हॉलमधील खेळाच्‍या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर, मल्‍टीप्‍लेक्‍सेस इत्‍यादींना 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.

या आदेशात नमूद केले आहे की कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव (स्विमींगपूल),योगा प्रशिक्षण संस्‍था, इन्‍डोअर हॉलमधील खेळाच्‍या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर,मल्‍टीप्‍लेक्‍सेस इत्‍यादींना खालील अ‍टी व शर्ती च्‍या अधिन राहून ५ नोव्हेंबर २०२० रोजी पासून परवानगी देण्‍यात येत आहे. जे स्विमींगपूल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्‍याकरींता वापरले जातील असे जलतरण स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्‍था तसेच सर्व प्रकारचे इन डोअर गेम्‍स जसे बॅडमिंटन,टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी, इत्‍यादींना शारिरीक अंतर व स्‍वच्‍छतेचे सर्व नियम पाळून ५ नोव्हेंबर २०२० रोजी पासून चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. सिनेमा हॉल/थिएटर/मल्‍टीप्‍लेक्‍सेस इ.त्‍यांच्‍या क्षमतेच्‍या ५० टक्के क्षमतेसह चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. परंतु सिनेमा हॉल, थिएटर,मल्‍टीप्‍लेक्‍सेस इ. मध्‍ये प्रेक्षकांना खाद्य पदार्थ नेण्‍यास परवानगी राहणार असणार नाही.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

vip porn full hard cum old indain sex hot