जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड  :- जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी त्यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले.
सोळा तालुक्यातील एकूण १ हजार १३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूका कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ९०७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण २ हजार ८५३ मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण १३ लाख २१ हजार २९६ मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून यात ६ लाख ३२ हजार १३८ महिला मतदार तर ६ लाख ८९ हजार १४६ पुरुष मतदार मतदान करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

vip porn full hard cum old indain sex hot