अमृत महोत्सवानिमित्त इंडिया रनचे आयोजन

0 0
Read Time:1 Minute, 36 Second

नांदेड (प्रतिनिधी ) दि. २४ :-  नेहरु युवा केंद्र संगठन युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकारच्यावतीने जन आंदोलनात सर्वाचा सहभाग या थिमप्रमाणे देशभरात ७४४ जिल्ह्यात व जिल्ह्यातील ७५ गावामध्ये १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शनिवार २५ सप्टेंबर रोजी जवळपास १०० युवक-युवती सहभागी होवून दौड होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यामध्ये सर्व विभागाचे विभागप्रमुख, विविध क्रीडा संगठना, युवक मंडळ, प्रतिनिधी व स्वयंसेवक यांचा सहभाग राहील. या रॅलीची सुरुवात सकाळी 7 वाजता आयटीआय पासून अण्णाभाऊ साठे चौक मार्गे स्टेडियम येथे होणार आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व भारताच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *