Read Time:1 Minute, 15 Second
नांदेड (प्रतिनिधी) दि. 24 : कोविड 19 च्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांना रु 1500 रुपयाचे सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. अनुदान ऑटो रिक्षा चालकांना ऑनलाईन पध्दतीने बँकेत जमा होणार आहेत.
ज्या परवानाधारक चालकांचे बँक खाते आधारशी लिंक नाही अशा परवानाधारकांनी कार्यालयामध्ये मॅन्युअल पध्दतीने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर फॉर्म भरण्यासाठी वाहन धारकांनी विधिग्राह्य परवाना, लायन्सस, आर.सी.विमा, बँक खाते चेक बुक इत्यादी कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन जमा करावी. सदर योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभाग यांनी केले आहे.