नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ६२० अहवालापैकी ४ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४ तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार ३९८ एवढी झाली असून यातील ८७ हजार ७१४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३२ रुग्ण उपचार घेत असून २ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५२ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा २, लोहा १, यवतमाळ १, असे एकूण ४ बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील २ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण २ व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज ३२ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणा ६, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १६, खाजगी रुग्णालय ४ अशा एकूण ३२ व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब – ७ लाख ५३ हजार ३५५
एकुण निगेटिव्ह स्वॅब – ६ लाख ४९ हजार ७१२
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ९० हजार ३९८
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ८७ हजार ७१४
एकुण मृत्यू संख्या – २ हजार ६५२
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. ३ टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ०१
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ०५
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ३२
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले – २