निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक

0 0
Read Time:1 Minute, 37 Second

नांदेड (प्रतिनिधी) :-  निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्या अक्षर निहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल तसेच जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर २०२१ चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.