नांदेड (प्रतिनिधी) :- माहूर नगर पंचायतची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपत असून पंचायतीसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर अन्वये जाहीर केला आहे. त्यानुसार माहूर नगरपंचायतीच्या एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या म्हणजेच शुक्रवारी दिनांक १२ नोव्हेंबर रोजी माहूर तहसिल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होईल.
अर्धापूर नगर पंचायतची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपत आहे. अर्धापूर नगरपंचायत मधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अर्धापूर तहसिल कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निश्चित करण्यात आला आहे. अर्धापूर नगरपंचातयतीच्या एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्व साधारण महिलासाठी आरक्षण सोडत होईल.
उद्या माहूर व अर्धापूर नगर पंचायत आरक्षण सोडत
Read Time:1 Minute, 39 Second
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%